Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा, एक दिवस नागपुरात करणार मुक्काम

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा, एक दिवस नागपुरात करणार मुक्काम

18 Apr 2024, 10:58 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : किरण सामंत रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर या जागांवरील उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात असल्यामुळं नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होत आहे. त्यातच किरण सामंत रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आल्यामुळं आता राजकीय खलबत जोरात सुरु असल्याच्या चर्चा होत आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी रात्री उशिरा ठाण्यात आले असता त्यांच्या भेटीसाठी ठाण्यातील लोकसभा इच्छुक उमेदवार रवींद्र फाटक, रत्नागिरी सिधुदुर्ग इच्छुक उमेदवार किरण सामंत उपस्थित होते. त्याचप्रमाणे शीतल म्हात्रे, नरेश म्हस्के, मंत्री दादा भुसे आणि संजय शिरसाठही उपस्थित होते. 

18 Apr 2024, 10:44 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :मतदानाच्या धर्तीवर नागपूरमध्ये सुरक्षेचे चोख बंदोबस्त 

नागपुरात लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी पोलिसही सज्ज झालेय. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त पाठवण्याची प्रक्रिया सध्या पार पाडली जात आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनवर एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड तसेच 100 मीटर परिसरामध्ये पुन्हा एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड अशी नेमणूक असणार आहे. मतदान केंद्रावर पोलिसांनी कशा पद्धतीने कर्तव्य पार पाडावे आणि काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास काय करावे याचे दिशा निर्देश सध्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत.. त्यानंतर पोलिंग पार्टीजसह हे पोलीस कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना केले जाणार आहे.

18 Apr 2024, 10:42 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : महापुरुषांना अभिवादन करून प्रणिती शिंदे होणार रॅलीत सहभागी

प्रणिती शिंदे आज महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळी सुशीलकुमार शिंदे काँग्रेस भवनात दाखल होतील. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधी महापुरुषांच्या  पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस भवन येथे रॅली सहभागी होणार आहे. 

18 Apr 2024, 10:41 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ठाण्याच्या जागेसाठी  भाजपचा आग्रह कायम

ठाण्याच्या जागेसाठी  भाजपचा आग्रह कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यात आमचीच ताकद जास्त असल्याचा आमदार संजय केळकर यांचा दावा. भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे अद्याप ठाण्याचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट. 

18 Apr 2024, 10:33 वाजता

बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज अर्ज दाखल करणार

 

Supriya Sule : महाविकासआघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे देखील आज आपला अर्ज दाखल करतील. पुण्यातल्या कौन्सिल हॉलमधल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज भरतील. सुप्रिया सुळेंसोबत मविआचे उमेदवार शिरुरमधून अमोल कोल्हे आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर देखील अर्ज भरतील. यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शांताई जवळ भव्य प्रचार सभा होणारेय. त्याठिकाणी तीनही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात येईल. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि सचिन आहिर तसंच आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटके उपस्थित राहणारेत

18 Apr 2024, 10:12 वाजता

सोलापुरात भगीरथ भालकेंचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा

 

Bhagirath Bhalke on Praniti Shinde : सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना बळ मिळणार आहे...भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिलाय...यामुळे प्रणिती शिंदे यांना मिळणार मोठी ताकत मिळू शकते...पोटनिवडणुकीत भालके यांनी 1 लाख मते घेतली होती...त्यामुळे याचा फायदा शिंदेंना होणार आहे...

18 Apr 2024, 09:52 वाजता

'ही निवडणूक गावकी, भावकीची नाही',आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

 

Shivajirao Adhalarao Patil on Amol Kolhe : ही निवडणूक गावकरी, भावकीची नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी असल्याचं महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हटलंय. मविआचे उमेदवार अमोल कोल्हे नारायणगावच्या दौ-यावर असताना गावक-यांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. शिवजन्मभुमीचा पुत्र म्हणुन अमोल कोल्हेंना संसदेत पाठविण्यासाठी ग्रामस्थांनी जाहिर पाठिंबा दिला. त्यावरून आढळरावांनी नारायणगावात येऊन ग्रामस्थांना चिमटा काढलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18 Apr 2024, 09:16 वाजता

'मविआच्या काळात देवेंद्र फडणवीसांना कधीही अटक झाली असती',चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट 

 

Chandrahar Patil on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय... मविआ सरकारच्या काळात 33 महिने आम्ही काय भोगलं हे आम्हालाच माहिती असं विधानही चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तर फडणवीसांनीही चंद्रकांत पाटलांच्या विधानाला दुजोरा दिलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

18 Apr 2024, 08:33 वाजता

महायुतीची आज पत्रकार परिषद

 

Mahayuti : मुंबईत महायुतीची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे...दीपक केसरकर, प्रसाद लाड, अनिल पाटील संबोधित करणार आहेत...महायुतीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी, नाशिकच्या जागांचा तिढा आहे...त्यामुळे महायुतीतील जागांचा तिढा सुटणार का याकडे लक्ष आहे...

18 Apr 2024, 08:13 वाजता

साताऱ्यात उदयनराजे भोसले आज उमेदवारी अर्ज भरणार 

 

Udayanraje Bhosale : महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले मोठं शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. यावेळी काढण्यात येणा-या महारॅलीची जय्यत तयारी करण्यात आलीये. जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी गांधी मैदानावरून या रॅलीला सुरुवात होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील राजेंच्या या रॅलीत सहभागी होणार आहेत.यानंतर ही रॅली पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर पोहचेल.. तिथं तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जनतेला संबोधित करतील. महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांच्या रूपाने तगडा उमेदवार उदयनराजेंच्या समोर दिला आहे.15 एप्रिलला मोठं शक्ती प्रदर्शन करत शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले किती मोठं शक्ती प्रदर्शन करतात याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-