Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकशाहीचा उत्सव सुरु होत असून, त्यासाठी संपूर्ण भारत देश सध्या सज्ज झाला आहे. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचं भवितव्य इथं मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.
19 Apr 2024, 18:46 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशात 21 राज्यातील 102 जागांवर मतदान झालं. आतापर्यंत 55 ते 60 ट्क्के मतदान झाल्याची माहिती आहे. पण नागालँडमध्ये एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. नागालँडमधल्या सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान झालं. इथल्या लोकांची आपल्या राज्यात स्वतंत्र प्रशासनाची मागणी आहे. नागालँड पीपल्स ऑर्गनायजेशनने मतदानवर बहिष्काराची घोषणा केली होती. याला तिथल्या लोकांनी प्रतिसाद दिला.
19 Apr 2024, 17:11 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. यादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचारही सुरु झाला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले आहेत. वर्ध्यात पीएम मोदी यांनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. जय गुरु म्हणत पीएम मोदींनी जनतेला वंदन केलं.
19 Apr 2024, 15:16 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळ यांची माघार
मी निवडणूक लढावी अशी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची इच्छा होती, असं वक्तव्य करत नाशिकमध्ये महाविकासआघाडीचा प्रचारही सुरु झाला असल्याची वस्तुस्थिती मांडत आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं छगन भुजबळ यांनी जाहीर केलं.
19 Apr 2024, 13:48 वाजता
विदर्भात एक वाजेपर्यंत झालेलं मतदान
नागपूर - 28.75 %
रामटेक - 28.73 %
भंडारा-गोंदिया - 34.56 %
चंद्रपूर - 30.96 %
गडचिरोली चिमूर - 41.01 %
19 Apr 2024, 13:45 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात 21 राज्यातील 102 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. मतदानात आतापर्यंत पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. सर्वाधिक म्हणजे 33.56% मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंय. योगगुरु बाबा रामदेव यांनी उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथं मतदान केलं. त्यांच्याबरोबर पतंजली आयुर्वेदचे संचालक आचार्य बालकृष्णही होते. तर तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये सदगुरु जग्गी वासूदेव यांनी मतदान केलं.
19 Apr 2024, 12:29 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात 102 जागांवर मतदान पार पडतंय. सकाळी 11 वाजेपर्यंत जम्मू-काश्मिरमध्ये 22.60 मतदान झालंय. तर महाराष्ट्रात 19.17 टक्के मतदान पार पडलंय. मध्य प्रदेशमध्ये 30.46, मणिपूरमध्ये 27.64, मेघालयात 31.65, पुद्दुचेरीत 27.63, राजस्थानमध्ये 22.51, मिझोरममध्ये 26.23, नागालँडमध्ये 22.50 टक्के मतदान झालंय.
19 Apr 2024, 11:40 वाजता
सकाळी ११ वाजेपर्यंतचे मतदान
भंडारा गोंदिया : १९.७२ %
चंद्रपूर : १८.९४ %
गडचिरोली-चिमुर : २४.८८ %
नागपूर : १७.५३ %
रामटेक : १६.१४ %
19 Apr 2024, 11:39 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील पाच जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. आता 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं याची टक्केवारी समोर आली आहे.
नागपुर लोकसभा मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत 17.53 % मतदान
रामटेक लोकसभा मतदारसंघात 16.140 टक्के मतदान
19 Apr 2024, 11:09 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: अभिनेता विजय सेतुपती मतदान केंद्रावर उपस्थित
अभिनेता विजय सेतुपती यानं तामिळनाडूतील चेन्नई येथे मतदानकेंद्रावर जात मतदाना केल्याचं पाहायला मिळालं.
19 Apr 2024, 11:09 वाजता
Lok Sabha Elections Voting Live Updates: अभिनेता विजय सेतुपती मतदान केंद्रावर उपस्थित
अभिनेता विजय सेतुपती यानं तामिळनाडूतील चेन्नई येथे मतदानकेंद्रावर जात मतदाना केल्याचं पाहायला मिळालं.
#WATCH | Tamil Nadu: Actor Vijay Sethupathi casts his vote at a polling booth in Chennai#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Npm8oahp5O
— ANI (@ANI) April 19, 2024