मुंबई : दुधाच्या दरात वाढ करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेट्टींनी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलन शांतीपूर्ण मार्गानं करण्याचं आवाहनही शेट्टींनी केलंय. मध्यरात्री अंधेरीतल्या नंदगिरी अतिथीगृहात दोन तास चर्चा झाली. पण त्यातून कुठलाही ठोस निर्णय पुढे आलेला नाही.
1) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात माढा-वैराग रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुभत्या गायी-म्हशी रस्त्यावर बांधून चक्का जाम केला. त्यामुळे त्या भागादील रहदारी ठप्प झाली. दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे अशी मागणी करत सरकारविरोधी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
2) पंढरपूरातील वाखरी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको कोलं. बैलगाडी, गाई म्हशीसह शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन हे आंदोलन केलं. यामुळे पुणे-साताऱ्या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
3) कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावरील स्वाभिमानीने दूध आंदोलनाबाबत पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री २ वाजता वडगांव पोलिसांनी वैभव कांबळे, शिवाजी माने, संपत पोवार,शिवाजी शिंदे,मनोहर देसाई यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात ठेवलं आहे.
4) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाचे पडसाद नंदूरबार जिल्ह्यातही पहायला मिळाले. शहादा इथं बऱ्हाणपूर अंक्लेश्वर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग अडवून धरला. यामुळे महामार्गावरील वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलय.
5) राज्यभरात सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दराच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शेवगावात मोफत दूध वाटप आंदोलन केलं. नगर शेवगाव रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्तारोको आंदोलनात देखील हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
6) बुलडाणा जिल्ह्यातील भादोला तसंच खामगाव रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बैलगाड्या तसंच जनावरं आणून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला सुरुवात होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आंदोलकांनी कोणत्याही प्रकारची तोडफोड केली नसताना आमच्यावर पोलिसांनी कोटे आणि ३०७ सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय.
7) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी परिसरातील १२ गावातील दुध उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन केलं...तसंच दहिवडी - शिखर शिंगणापुर रस्त्यावर चक्का जाम आंदोलनही केलं..स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनाच चक्काजाम आंदोलन करण्याचं आलवाहन केल्यानंतर आता गावागावातून शेतकरी दूध आंदोलनात सहभाग घेतो आहे.
8) आजच्या किणी टोलनाक्यावरील स्वाभिमानीने दूध आंदोलनाबाबत पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री २ वाजता वडगांव पोलिसांनी वैभव कांबळे, शिवाजी माने, संपत पोवार,शिवाजी शिंदे,मनोहर देसाई यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात ठेवलं आहे.
9) अजून एक दिवस संप सुरु राहिला तर मुंबईत महानंद दुधाचा तुटवडा जाणवेल अशी माहिती महानंद डेअरीचे उपव्यवस्थापक एस.व्ही.चौधरी यांनी दिली. गोरेगाव इथल्या महानंदा डेरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दूध आलेली नाही. संपाची हाक देण्यात आल्यानं अगोदरपासूनच दुधाचा साठा महानंदा डेरीमध्ये करण्यात आला होता. परंतु संपामुळे सोमवार आणि मंगळवारी दूध न आल्यामुळे आता महानंद दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यत आहे.