बारामतीत अवैध दारू विक्री, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. 

Updated: Sep 30, 2018, 04:01 PM IST
बारामतीत अवैध दारू विक्री, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  title=

पुणे : बारामती तालुक्यातील पिपळी गावात अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. दारूचे 3000 हजार लिटर रसायन आणि साहित्य आग लावून नष्ट करण्यात आले. 

बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शोभा लांडगेंनी ही कारवाई केली. झारगडवाडी गावांमध्ये ज्याठिकाणी अवैध दारु विक्री चालू आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, कुठेच काही सापडलं नाही. त्यावेळी जवळच असलेल्या पिपळी गावाकडे त्यांनी मोर्चा वळवला. 

गावालगत असलेल्या कालव्या शेजारीच हातभट्टी काढत असल्याचं त्यांना आढळून आलं. त्यावेळी दारूनं भरलेले 200 लिटरचे 14 पिंप आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्या ठिकाणी आढळलं.