जन्मठेप झालेला गुन्हेगाराला बनवलं भाजपाचा पदाधिकारी

हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला नागपुरात भाजपा पदाधिकारी बनवल्याचं समोर आलंय.

Updated: Nov 16, 2018, 09:02 PM IST
जन्मठेप झालेला गुन्हेगाराला बनवलं भाजपाचा पदाधिकारी title=

नागपूर : हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला नागपुरात भाजपा पदाधिकारी बनवल्याचं समोर आलंय. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष बनविले आहे. शहरात त्याच्या पाठिराख्यांनी काही ठिकाणी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. 

नरेंद्र सिंह दिगवा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 2012 मध्ये सुरज यादव या तरुणाची हत्या केली होती. तेव्हा दिगवाच्या टोळीवर मोक्का लावला होता. 2016 मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने दिगवासह 10 जणांना हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 

दिगवा सध्या उच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन घेऊन बाहेर आला होता. शहर भाजपने त्याला उत्तर नागपूर मंडळचा झोपडपट्टी सेलचा उपाध्यक्ष बनविले आहे.