'भाऊ मले भी द्या पाटोडी...', नागपुरात बिबट्याच्या भ्रमंतीवरून मिम्स जोमात

नागपूर शहरात बिबट्याची एक आठवड्यापासून भ्रमंती 

Updated: Jun 4, 2021, 01:12 PM IST
'भाऊ मले भी द्या पाटोडी...',  नागपुरात बिबट्याच्या भ्रमंतीवरून मिम्स जोमात title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर शहरात बिबट्याची एक आठवड्यापासून भ्रमंती सुरु आहे. एकीकडे बिबट्याच्या शोधात वनविभागाची झोप उडाली असताना दुसरीकडे सोशल मीडियावर या बिबट्याच्या शहरातील भ्रमंतीवर तयार करण्यात आलेले मीम्स व्हायरल झाले आहेत. ज्या भागात बिबट्या दिसला त्या भागाशी निगडीत हे मीम्स तयार करण्यात आलेले आहे. बिबट शहरातील  ज्या भागात दिसलाचं माहिती समोर आली त्या भागातील ओळख,खाद्य संस्कृती याच्याशी बिबट्याला जोडून समर्पक  असे हे मिम्स व्हायरल झालेत.

नागपूरात गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याचीच चर्चा सुरु आहे. गेल्या शुक्रवारी शहरात घुसलेला एक बिबिट वनविभागाशी लपंडाव खेळत आहे. एकीकडे या बिबटच्या शोधात वनविभागाची मोठी यंत्रणा कामाला लागली असली तर दुसरीकडे बिबट्या मात्र सर्वांना हुलकावणी देत शहरातील विविध भागात दर्शन देत फिरत आहे. हा बिबट्या नागपुरातील सर्वप्रथम आयटी पार्क शेजारी गायत्रीनगर परिसरात स्थानिकांना दिसला होता. त्यानंतर आयटीपार्क, व्हीएनआयटी, महाराज बाग प्राणी संग्रालय आणि गुरुवारी तो सिव्हील लाईन्सपर्यंत या बिबट्याची भ्रमंती सुरु होती.

बिबटयाच्या याच भ्रमंतीवरून तो ज्या परिसरातून जातो त्या परिसराची ओळख, खाद्यसंस्कृतीला घेवून तयार झालेले मीम्स आता व्हायरल होवू लागले आहे..एकीकडे शहरात बिबट्याचा वावर असताना त्याची धाकधूक तर दुसरीकडे त्याच्या भ्रमंतीवरील हलकेफुलके मीम्स चांगलेच चर्चेत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील बिबट्याचा शोध सुरु झाल्यानंतर तर हा बिबट चक्क  नागपुरातील खाद्यप्रेमींची आवडती तर्रि पाटोडी खायला पोहचल्याचं अफलातून मीम्स आहे. तर जिल्हाधिकारी कार्यलयाजवळ झेरोक्स सेंटरवर झेरॉक्स  मागत बिबट उभा असल्याचंही एक मीम्स आहे. 

नागपुत भ्रमंती करत असल्याचे बिबट्याच्या मीम्स

बिबटची डीमांड..बादशाह एक प्लेट पाटोडी लगा दे यार

सिव्हील लाईन्समधील जिल्हाधिकारी कार्यलयाजवळील पाटोडी खाद्यप्रेमींचं आवडत ठिकाण.. बिबट्याची सिव्हील परिसरात भ्रमंती सुरु असल्याचं कळतातना याला धरून लगेच बादशाह एक प्लेअट पाटोडी दे असं मीम्स व्हायरल झालं.यामध्ये बिबट्या पाटोडी मागत असल्याचं दाखवलं आहे.

बिबट्या मागतोय आधारची झेरोक्स

जिल्हाधिकारी कार्यलय परिसरात अनेक प्रशासकीय कार्यालय आहे... अनेकजण तिथं प्रशासकीय कामांसाठी आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी झेरॉक्स सेंटरवर उभे असतात असतात. त्यामुळं  भ्रमंतीवर असलेला बिबट प्रशासकीय कामाच्या निमित्तान  झेरोक्स मागत असल्याचंही मार्मीक मिम्सही चांगलच व्हायरल झालंय.

बिबट आयटी पार्कमध्ये ज़ॉबच्या शोधात शहरात दाखल झाल्यानंतर बिबट आयटी पार्कमध्ये सुरुवातीलाच दिसला होता....लॉकडाऊनमध्ये बिबट जॉब शोधायला तो आयटी पार्कमध्ये आल्याच्या आशयाचं मीम्सही आहे..

बिबट्याचा वावर भटके कुत्रे तणावात बिबट नागपुरात विविध ठिकाणी दिसत असताना शहरातील भटके कुत्र मात्र घाबरलेले असून ते तणावात असल्याचंही एक मीम्सही व्हायरल झालंय.