कोल्हापुरात अल्पवयीन मुलाकडून महिलेची हत्या

कोल्हापूरातील शास्त्रीनगर इथल्या एका अल्पवयीन मुलानं शेजारी राहाणा-या 35 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Updated: Sep 7, 2017, 08:37 PM IST
कोल्हापुरात अल्पवयीन मुलाकडून महिलेची हत्या title=

कोल्हापूर : कोल्हापूरातील शास्त्रीनगर इथल्या एका अल्पवयीन मुलानं शेजारी राहाणा-या 35 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

या १६ वर्षीय अल्पवयीन मुलानं संबधित पुजा महाडीक महिलेचे मोबाईलवरुन  फोटे काढल्याचं पोलीस तपासात पुढे आलय. 

या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेवून तपास सुरु केलाय. पण या अल्पवयीन मुलानं खून कशासाठी केला, याबाबत अजून माहिती मिळालेली नाहीये.