कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.

Updated: Mar 11, 2018, 10:59 PM IST
कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी title=

मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे. कुमार केतकर हे महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रांचे संपादक होते. कुमार केतकर यांना पत्रकारितेचा प्रदिर्घ अनुभव आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध?

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हं आहेत. सहा जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. भाजपनं याआधीच तीन नावांची घोषणा केली आहे. तर काँग्रेसनंही एक उमेदवार घोषित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही प्रत्येकी एक उमेदवार असण्याची शक्यता आहे.

हे आहेत भाजपचे तीन उमेदवार

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.मुरलीधरन या तिघांना भाजपनं संधी दिली आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून तीन खासदार जाणार आहेत.