कोकणाच्या दिेशेने जाणाऱ्या ट्रेन रद्द, चाकरमान्यांची तारांबळ

मुंबईतून कोकणमार्गे जाणाऱ्या ट्रेन अचानक रद्द झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ

Updated: Aug 30, 2019, 10:07 PM IST
कोकणाच्या दिेशेने जाणाऱ्या ट्रेन रद्द, चाकरमान्यांची तारांबळ  title=

मुंबई : मुंबईतून कोकणमार्गे जाणाऱ्या ट्रेन अचानक रद्द झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान तिरूवनंतपुरम या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणत डोंगरावरील माती पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे रुळाचा असंख्य भाग माती खाली गेला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईमार्गे कोकण गाठून दक्षिण राज्यातील स्थानकात प्रवेश करणाऱ्या असंख्य ट्रेन रद्द केल्या आहेत. 

याचा फटका ऐन गणेशोत्सवात असंख्य चाकरमान्यांना बसणार आहे.त्यामुळे किमान या गाड्या मांडवी,रत्नागिरी, सावंतवाडी पर्यंत सुरू ठेवाव्यात अशी मागणी मुंबईतल्या खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यां सोबत झालेल्या बैठकीत केली.मुंबईमार्ग कोकणातून दक्षिणेत जाणाऱ्या नेत्रावली, एलटीटी-एर्नाकुलम,भावनगर- कोचुवेली एलटीटी-कोचुवेली, पुणे—एर्नाकुलम, ओखा-एर्नाकुलम वाया वसई-विरार अशा असंख्य ट्रेन रद्द केल्या आहेत.

गणेशोत्सवात असंख्य प्रवाशी कोकण गाठतात. मात्र तिरुवनंतपुरम येथे घडलेल्या घटनेने असंख्य प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव व चाकरमान्यांची प्रवाशी संख्या पाहता सदरच्या रद्द केलेल्या ट्रेन कोकणातील काही स्थानकापर्यंत सुरू ठेवाव्यात अशी मागणी मुंबईतील खासदारांनी केली आहे.