कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!

Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही  बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 8, 2024, 10:26 AM IST
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या! title=

Konkan Railway Megablock News Update : कोकण रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाडया सुरळित आणि सुरक्षित धाव्यात म्हणून कोकण रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. याचपार्श्वभूमीर कोकण रेल्वेकडून आडवली - आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी उद्या (9 फेब्रुवारी) ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा परिणाम एक्स्प्रेस होणार आहे. मेगाब्लॉकमुळे दोन एक्स्प्रेस तब्बल 90 मिनिटे उशीराने धावणार आहेत. जर तुम्ही 9 फेब्रुवारील कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक एकदा नक्का तपासा...  

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आडवली - आचिर्णे स्थानकादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 2.30 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 9 फेब्रुवारीला सकाळी  ते सकाळी 11.30 या वेळेत असणार आहे. मात्र या ब्लॉकचा परिणाम सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेस आणि मुंबई सीएसएमटी - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास विलंबाने होणार आहे. 
10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसचा प्रवास 9 फेब्रुवारीला सावंतवाडी रोड - कणकवली विभागादरम्यान 90 मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. तर  12051 मुंबई सीएसएमटी - मडगाव जं.सुरू होणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा: ना अंडी, ना केळी; मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, भंडाऱ्यातील संतापजनक घटना

कोकण रेल्वेची विशेष मेमू 

कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर असून कोकण रेल्वेने चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईहून चिपळूणला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01158 चिपळूण - पनवेल अनारक्षित स्पेशल मेमू रविवारी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी पनवेल, 31 मार्चपर्यंत त्याच दिवशी रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01157 पनवेल-रत्नागिरी अनारक्षित विशेष मेमू रविवारी रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

या गाडीला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे स्टेशनवर थांबा असून या ट्रेनला 8 कोच आणि  अनारक्षित मेमू असणार आहे.