रत्नागिरी : कोकण रेल्वेचं वेळापत्रक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडंलय. गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वेवर जादा रेल्वे सोडल्या जातात. मात्र कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर मार्गावर एकेरी ट्रॅक असल्यामुळं ट्रेन बंचिंगची मोठी समस्या निर्माण होतेय. या मार्गावर दिवसाला सुमारे ९० गाड्या धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिलीय.
पहिल्या दिवशी कोकण रेल्वेने गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसला. पाच तास प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.ऐन गणेशोत्सवात गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. डाऊन मांडवी, डबल डेकर, दुरांतो, हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस वगळता अन्य गाड्या काल उशिराने धावत होत्या. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणेशभक्तांचे प्रचंड हाल होत आहेत.
कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांना तुफान गर्दी असल्याने ही चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ट्रेन बंचिंगमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या एकामागे एक थांबल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा संताप व्यक्त होत आहे.