नववर्ष स्वागतासाठी कोकणातले किनारे पर्यटकांनी फुलले

कोकणातील किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती

Updated: Dec 31, 2019, 04:24 PM IST
नववर्ष स्वागतासाठी कोकणातले किनारे पर्यटकांनी फुलले title=
संग्रहित फोटो

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातले किनारे फुल्ल झालेत. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणची निवड केली आहे. 

निळा समुद्र, हवेतला गारवा आणि मस्त हिरवाई यांसाठी कोकण पर्यटकांना आकर्षित करतंय. नववर्ष स्वागतासाठी राज्यातल्या अनेक पर्यंटकांचे पाय यावर्षी कोकणाकडे वळलेत. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट, हॉटेल्स फुल झाली आहेत. 

दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, पुणे इथून कोकणात पर्यटक आलेत. परदेशी पाहुण्यांनीही कोकणाला पसंती दिली आत आहे. 

गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली, गुहागर या ठिकाणांना चांगली पसंती लाभतेय. वॉटरस्पोर्टस, समुद्रात भिजणे, डॉल्फीन राईड यांना पसंती लाभतेय. 

आबालवृद्ध सध्या समुद्र किनाऱ्यावर मस्त बागडत आहेत. नववर्ष स्वागतासाठी कोकणाला पर्यटकांनी पसंती दिल्याने विविध सेवा पुरवणारे स्थानिक, तसंच दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांचाही इयर एंड समाधानकारक जातोय. 

तर, नाताळची सुट्टी, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचं सेलिब्रेशन, यामुळे मुंबई-पुण्यापासून जवळचं डेस्टिनेशन असलेले रायगडचे किनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेले आहेत.