कोल्हापूर : गेले कित्येक दिवस येथील मटण दरावर तोडगा निघत नव्हता. मटण दरवाढीवरून निर्माण झालेल्या तिढ्यावर बैठका घेण्यात आल्या. मात्र, कोणाचे एकमत होत नव्हते. मटण दरवाढीचा तिडा सुटावा यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. या बैठकीला मटण विक्रेत्यांनी यायला नकार दिला होता. त्यामुळे मटण दरवाढीचा तिढा कायम राहिला होता. मात्र, आज अखेर मटण दराचा तिढा सुटला. आता शहरात मटण ४८० रुपये दराने विक्री होईल. तसे एकमत झाले आहे. कोल्हापूरकरांची मागणी खाटीक समाजाने मान्य केली आहे. कोणाचे आर्थिक नुकसान होऊ नये, असा तोडगा निघाला आहे.
कोल्हापुरातील मटण दरवाढीवरून निर्माण झालेल्या तिढा सुटला आहे. कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यावेळी तोडगा निघाला नव्हता. तर मटण विक्रेत्यांनी ५४० रुपये किलोच्या खाली मटण विकणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तर त्या उलट ग्राहक समितीने मात्र ४५० रुपयांच्यावरती एक नया पैसा नाही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापुरातील मटण दराचा तिढा कायम होता.
गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरात मटण दरवाढीचा अखेर सुटल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मटण विक्रेते आणि ग्राहक आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे मटणाच्या दराचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळेच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याना यामध्ये हस्तक्षेप करत मध्यस्थी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मटन दराचा प्रश्न मिटावा यासाठी मटण दर निश्चिती समिती गठीत केली. पण या समितीत येण्यास मटण विक्रेत्यांनी विरोध करत मटणाचे दर अवघ्या वीस रुपयांनी कमी करत ५४० रुपये किलो दर केले. त्यामुळेच मटण दरवाढीचा तिढा कायम होता. त्यामुळेच कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीनी पुन्हा एकदा बैठक बोलवली. या बैठकीला ग्राहक समितीचे सदस्य हजर राहिले पण मटण विक्रेत्यांनी पुन्हा या बैठकीकडे पाठ फिरवत मटण दर काही केल्या कमी करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
मटण विक्रेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ग्राहक समितीचे सदस्य चांगले संतापले होते. कोल्हापूरकर आणि मटणाचं अतूट नातं आहे. याचाच फायदा मटण विक्रेते घेणार असतील तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका ग्राहक समितीच्या सदस्यांनी घेतली आहे. इतकच नव्हे तर ४५० रुपयांवरती अधिक दर देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती.
तर दुसरीकडे मटण दर समितीच्या अध्यक्ष आरोग्य अधिकारी दिलीप पाटील यांनी मटण विक्रेत्यांना फोन करून बैठकीच्या ठिकाणी बोलावले, पण मटण विक्रेत्यांनी आम्ही दुकान बंद ठेवू पण मटणाचे दर कमी करणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली होती. त्यामुळे तिढा अधिकच वाढला होता.