प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडहिंग्लज मधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून आपण स्वतः आत्महत्या केलीय. बलात्काराच्या आरोपातून व्यथित झाल्याने संतोष शिंदे यांनी आपलं जीवन संपविल्याची माहिती मिळत आहे. बलात्काराच्या आरोपातून शिंदे एक महिना तुरुंगामध्ये होते. याच तणावातून संतोष शिंदे यांनी आधी पत्नी आणि मुलाचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर उद्योगपती संतोष शिंदे यांनी स्वता विष पिऊन आणि त्यानंतर गळा चिरून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
गडहिंग्लज पोलिसांनी या संदर्भात अद्याप कोणतेही माहिती दिली नसून पोलीस पोलीस अधिक तपास करत आहेत. सकाळी बेडरूमचा दरवाजा उघडला नाही म्हणून आईने शेजाराच्या मदतीने दरवाजा खोलल्यानंतर संतोष शिंदे यांनी जीवन संपविल्याचे समोर आलं. संतोष शिंदे यांचे गडहिंग्लज आणि त्याचबरोबर सकेश्वर परिसरात मोठा उद्योग व्यवसाय आहे.. या उद्योगांमध्ये जवळपास 500 हून अधिक कामगार कामावर आहेत. त्यामुळे गडहिंग्लज परिसरात खळबळ उडाली आहे.
कोण होते संतोष शिंदे?
संतोष शिंदे यांनी लहान वयापासून मेहनतीने आणि जिद्दीने मोठी भरारी घेतली होती. मुंबई,कोकणसह कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योगाचा विस्तारला केला होता.त्यांच्यामागे आई, विवाहित बहिण असा परिवार आहे
लहान वयात मोठ्या उद्योगाची उभारणी
गडहिंग्लज येथील उद्योगपती संतोष शिंदे यांनी अगदी लहान वयात मोठ्या प्रमाणात कष्ट करून अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती या अंतर्गत त्यांनी तेल उत्पादन ,व्यायामशाळा, बेकरी उत्पादन यासह विविध उत्पादन करत होते. त्यांच्या या उत्पादनाला ग्राहकांची मोठी मागणी होती. त्यांचा हा व्यवसाय महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये देखील विस्तारला होता, दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता या आरोपांखाली ते महिनाभर जेलमध्ये देखील होते यानंतर ते बाहेर आले. तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा नव्याने उभे राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना यामध्ये अपयश आले यामुळे ते तणावाखाली होते.
आत्महत्येच्या ठिकाणी सुसाईड नोट
दरम्यान, संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत असल्याचे कळतंय. त्यामुळे महिलेला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली. शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी फेरी मारून बंदचे आवाहन करत त्या दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे.