प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर (kolhapur News) जिल्ह्यातील हुपरी इथल्या जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या दूधगंगा डाव्या कालव्यात एक जळालेली कार (burning car) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारमध्ये जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे. पंचनाम्यानंतर पोलिसांनी (kolhapur Police) या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
शनिवारी सकाळी जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यात 40 फूट खोल एक कार पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून क्रेनच्या सहाय्याने कार पाण्याबाहेर काढली असता ती जळालेल्या अवस्थेत आढळली. यानंतर पोलिसांनी कारच्या काचा फोडून पाहिले असता धक्कादायक वास्तव समोर आले. कालव्यात कोसळलेल्या या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
अधिक तपासानंतर हा मृतदेह मोतीराम महादेव रजपूत याचा असल्याचे समोर आले आहे. मोतीरामचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे नेमकं काय घडलं याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. तसेच नेमका हा अपघात आहे की घातपात याची माहिती हुपरी पोलीस घेत आहेत.