कोल्हापूर : राज्यासह देशभरात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patient) वाढ होत असून ऑक्सिजनचा तुटवडा (Oxigen Supply) मोठ्या प्रमाणात जाणवतोय. दरम्यान कोल्हापुरातून एका धक्कादायक बातमी समोर येतेय. कोल्हापुरातील छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयात (CPR) रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय.
रुग्णालयात 600 लिटर म्हणजे 15 तास पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. अन्य शहरातून आज रात्रीपर्यंत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होईल असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कोल्हापुरात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होतोय. इथे गेल्या 24 तासांत तब्बल 832 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सर्वाधिक 296 रुग्ण हे कोल्हापूर शहरातले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 58 हजार 583 रुग्णांना कोरोनाची लागण झाली तर 1 हजार 939 रुग्णाचा कोरोनाने मृत्यु झालाय.
कोल्हापुरात 15 वर्षाच्या आतील 52 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेने सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
शहरात कोरोनाचे 1 हजार 107 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 15 वर्षाखालील 52 मुलं कोरोना पॉझिटिव्ह तर 60 वर्षावरील 137 जेष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.
राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे.
कोरोनाचा कहर पाहाता गेल्या 24 तासांत भारतात 1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत भारतात 1 लाख 80 हजार 530 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1, 31,08,8582 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. देशात 20 लाख 31 हजार 977 रूग्मांवर उपचार सुरू आहेत.