गणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका

 शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला. 

Updated: Sep 24, 2018, 02:23 PM IST
गणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका  title=

कोल्हापूर : काल दिवसभर राज्यभरात शांततेत मिरवणूका पार पडल्या. याच महत्त्वाचं श्रेय पोलिसांना देणं गरजेचं आहे. न्यायालयाचा निर्णय, कायद्यातील नियम आणि गणेशभक्तांच्या भावना यांचा सुंदर मेळ त्यांनी साधला. याबद्दल पोलिसांच कौतूक कराव तितक कमीचं.  कोल्हापूरमध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला.

अखेरच्या मूर्तीचं विसर्जन पार पडल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि इतर उपस्थित पोलिसांना डान्स करण्याचा आग्रह धरला आणि पोलिसांनी मिरवणूक मार्गावरच ठेका धरला.

पोलिसांना डोक्यावर 

 उत्साही कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांना खांद्यावर घेतलं आणि कोल्हापुरी पद्धतीनं ठेका धरायला भाग पाडलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कोल्हापुरचे डी.वाय. एस. पी. प्रशांत अमृत यांनाही खांद्यावर घेत ठेका धरला. यंदा कोल्हापूरकरांनी नो डॉल्बी, नो डीजेचा नारा देत लेझीम आणि हलगीच्या तालावर शांततेत मिरवणूक पार पाडली.