कबड्डी स्पर्धेत घडली अत्यंत थरारक आणि भयानक घटना; मैदानात पळापळ...

चाकू हल्ला झाल्यानंतर कबड्डीचे सामने काही काळ बंद करण्यात आले होते. मात्र, काही वेळाने सामने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. चाकू हल्ला नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

Updated: Dec 17, 2022, 09:24 PM IST
कबड्डी स्पर्धेत घडली अत्यंत थरारक आणि भयानक घटना; मैदानात पळापळ... title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  कबड्डी स्पर्धेत(Kabaddi tournament ) घडली अत्यंत थरारक आणि भयानक घटना घडली आहे. अमरावती(Amravati) येथील तिवसा शहरात सुरू असलेल्या कब्बड्डी स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. कबजड्डी स्पर्धेदरम्यान एका तरुणावर चाकूने हल्ला(Knife attack) करण्यात आला. या घटनेमुळे मैदानात एकच खळबळ उडाली(Crime News). 

अमरावतीच्या तिवसा शहरातील यादव देशमुख महाविद्यालयात कब्बड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धे दरम्यान शनिवारी 7:20 वाजता नितीन सर्कल पवार (वय 24 वर्ष) या तरुणावर अचानक चाकू हल्ला झाला.  नितीनच्या मानेवर चाकूने वार करत हल्ला करण्यात आला आहे. कबड्डी स्पर्धेमुळे मैदानात मोठी गर्दी होती. एवढ्या गर्दीतच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चाकू हल्ला झाल्यानंतर कबड्डीचे सामने काही काळ बंद करण्यात आले होते. मात्र, काही वेळाने सामने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. चाकू हल्ला नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, हल्लेखोर कोण आहे. त्याने नितीवर हल्ला का केला. चाकु हल्ला झाल्याने स्पर्धेच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नव्हती का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. हा तरुण स्पर्धक होती की कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आला होता. याबाबत काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.