Kisan Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून, एका शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ

Kisan Sabha Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून आहेत.  (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलन मागे घेण्याबाबत आमदार जे पी गावित बैठकीत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन आज संपण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Mar 18, 2023, 11:00 AM IST
Kisan Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून, एका शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ title=

Kisan Sabha Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून आहेत. आंदोलन कधीही मागे घेतलं जाऊ शकते. ( Farmers Morcha)  त्यासाठी प्रशासनाकडून बसेसची सोय करण्यात आलीय. (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलन मागे घेण्याबाबत आमदार जे पी गावित बैठकीत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन आज संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आतातरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. (Kisan Morcha )

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर गावित यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुढील घोषणा होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात गावीत आपली भूमिका शेतकऱ्यांसमोर स्पष्ट करतील. त्यामुळे हे आंदोलन मागे घेणार की पुढे सुरु ठेवणार यावर काही वेळात शिक्कामोर्तब होणार आहे.

14 मार्च रोजी मुंबईच्या दिशेनी निघालेला शेतकरी लाँग मार्च शहापूरजवळ पोहोचलेला असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे आंदोलनातील नेते आमदार विनोद निकोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील अशी शक्यता आहे. जर या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर हा मोर्चा पुन्हा विधिमंडळावर धडकेल असे विनोद निकोले यांनी म्हटले आहे. आम्ही चार दिवस सीमेवरच वाट पाहूत आणि जर त्या मागण्यांवर अंमलबजावणी होताना दिसली नाही तर तो मोर्चा पुन्हा मुंबईत येईल असं आम्ही सांगितलं आहे, असे निकोले यांनी म्हटले.

दरम्यान, लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केलंय. परंतु, मुक्काम हलावयचा की नाही त्याचा निर्णय आज शेतकऱ्यांशी चर्चा करून घेण्यात येणार आहे. माजी आमदार जे पी गावितांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारच्या अश्वासनांवर विश्वास नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. निर्णयाची  अंमलबजावणी होईपर्यंत माघार नको, अशी शिष्टमंडळातल्या काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानभवनातील शिष्टमंडळ आता मोर्चास्थळी गेल्यावर नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.