Satara Mumbai Highway : प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सातारा - मुंबई वाहतूक आजपासून इतके दिवस बंद

Satara Mumbai Traffic Update : कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 तास बंद राहणार आहे. व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळविण्यात आली आहे. 

Updated: Mar 18, 2023, 10:14 AM IST
Satara Mumbai Highway : प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सातारा - मुंबई वाहतूक आजपासून इतके दिवस बंद  title=

Satara Mumbai Traffic Update : सातारा-मुंबई महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.  (Satara Mumbai Highway Closed ) मुंबईकडे जाणारी वाहने 18 मार्च आणि 23 मार्च रोजी सहा तास बंद राहणार आहेत. पुण्याजवळील कात्रज येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बोगद्यामध्ये काही यंत्रणा बसविल्यामुळे हा महामार्ग काही तासांसाठी वाहतुकीला बंद ठेवण्यात आला आहे. (Satara Mumbai Traffic)

कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 तास बंद राहणार आहे.18 मार्चला रात्री 11 ते 19 मार्चला पहाटे 2 वाजेपर्यंत तसेच 23 मार्चला रात्री 11 ते 24 मार्च 2023 ला पहाटे 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल. व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 

बंददरम्यान या रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरु राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा ते मुंबईकडे जाणारी वाहनांची वाहतूक 23 मार्च आणि 24 मार्च रोजी रात्री 11 ते 2 (19 मार्च) आणि त्याचप्रमाणे रात्री 11 ते 2 या वेळेत बंद राहणार आहे. बंद दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहने जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक आणि नवले पूल मार्गे वळवण्यात येणार आहेत.