Crime News : विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले

Nashik Murder News : कोट्यवधी रुपयांची विम्याची रक्कम हडपणाऱ्या सोनेरी टोळीने आणखी एक खून केला आहे. या खून प्रकरणी टोळीतील सहाही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.

Updated: Dec 29, 2022, 03:18 PM IST
Crime News : विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले title=
संग्रहित छाया

Nashik Crime News : गेल्या पंधरवाड्यात नाशिक शहरात बोगस व्यक्तीच्या नावाने विम्याचे (Insurance) 4 कोटी हडपणाऱ्या सोनेरी टोळीने आणखी एका जणाचा खून केल्याच उघड झाले आहे. (Nashik Murder) या प्रकरणात रामकुंड परिसरातून बनावट मृतदेह दाखविण्यसाठी एका अनोळखी गुजराथी व्यक्तीची कार खाली चिरडून हत्या करण्यात आल्याच पोलीस तपासात समोर आले आहे. (Nashik police) या हत्येप्रकरणी सहा जणाविरोधात म्हसरुळ पोलीस स्टेशनला बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Crime News)

हत्या केल्याच्या आरोपाखाली सहा जणांना अटक 

नाशिक शहर पोलिसांनी 4 कोटी रुपयांच्या जीवन विम्याच्या रकमेचा दावा ( Claim Insurance) करण्यासाठी वर्षभरापूर्वी एका व्यक्तीची हत्या केल्याच्या आरोपाखाली सहा जणांना अटक केली होती. (Maharashtra : 6 Arrested For Killing Man To Claim Insurance Of RS 4 Crore) या प्रकरणातील मुख्य संशयित मंगेश बाबुराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक, सुनियोजित खून केल्याचे आढळून आले

2 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथील रस्त्यालगत 46 वर्षीय अशोक भालेराव झाडाझुडपांमध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी भालेराव यांच्या डोक्याला जखम आणि अंगावर वाहन गेल्याने मृत्यू झाल्याचा गुन्हा अज्ञात वाहनचालकाविरोधात मुंबई नाका पोलिसांनी दाखल केला होता. या प्रकरणाचा गेल्या महिन्यात नव्याने तपास केला असता अपघात नव्हे तर चार कोटी रुपयांची विमा रक्कम हडपण्यासाठी सुनियोजित खून केल्याचे आढळून आले.

या प्रकरणाला मिळाले आता नवीन वळण

पोलिसांनी विम्याची रक्कम लाभार्थी संशयित महिला रजनी कृष्णदत्त उके हिला ताब्यात घेत कायद्याचा धाक दाखविताच तिने गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीत नाशिकच्या संशयित मंगेश सावकार, दीपक भारुडकर, किरण शिरसाठ, हेमंत वाघ आणि प्रणव साळवे यांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या या सहाही जणांनी अशोक भालेराव यांच्या हत्येआधी आठ महिने एका गुजराती व्यक्तीही हत्या केल्याचं उघड झाल्याने या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे

या प्रकरणात अजून काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या गुजराती माणसाचा खून अशोक भालेराव प्रकरणातच झाला की वेगळा विमा लाटला गेला, याचाही तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे