खेड बलात्कार : पोलीस निरीक्षक निलंबित - गृहराज्यमंत्री केसरकर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 11:42 PM IST
खेड बलात्कार :  पोलीस निरीक्षक निलंबित - गृहराज्यमंत्री केसरकर title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. पोलिसांनी याप्रकरणात मुलीच्या हत्येला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत केली. 

विधानसभेत लक्षवेधीद्वारे या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होतं. पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असून दोषींना पाठिशी घातलं जात असल्याचा आरोप विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही आज विधानसभेत केला. लक्षवेधीद्वारे या गंभीर प्रकरणाकडे आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सीआयडी चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिलेय.

दुर्दैवी मुलीच्या आईला धमकावून आणि पैशांचे आमिष दाखवून गप्प केले जात असून याप्रकरणी पोलीस आरोपी असलेल्या गगनगिरी कात इंडस्ट्रीजच्या मालकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत गोंधळ केला.