नडत राहू, भिडत राहू; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाला?

मंत्रालयासमोर केलेल्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना नोटीस पाठविली आहे. या नोटीसवरून चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केलीय.

Updated: Feb 17, 2022, 05:21 PM IST
नडत राहू, भिडत राहू; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाला? title=

मुंबई : मंत्रालयासमोर केलेल्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना नोटीस पाठविली आहे. या नोटीसवरून चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केलीय. तसेच गुन्हा दाखल करायचाच असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा असे आव्हान मुंबई पोलिसांना दिलंय. 

चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय. यात त्यांनी म्हटलंय. "षंढ सरकारची, षंढ यंत्रणा" सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पाच महिन्यापूर्वी साकीनका येथे एक घटना घडली. त्यानंतर राज्यात रोज वाढणारे लहान मुलींवरचे सामूहिक बलात्कार या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी आम्ही केली. 

 

त्यासाठी राज्यपालांना पत्र पाठविलं होतं. त्याला मुख्यमंत्र्यांनी अतिशय निर्लज्जपणे उत्तर दिलं. त्याचा निषेध म्हणून मंत्रालयासमोरच मी, भाजप आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर यांनी आंदोलन केलं.

काल सर्वज्ञानी यांनी राज्यातल्या एजन्सी आम्ही कामाला लावू असं सूतोवाच केलं. त्यांनतर लगेचच आम्हाला नोटीस आल्या. पाच महिन्यानंतर या नोटीस पाठविण्यात आल्या. पण, माझं एकच सांगणं आहे, जर मुंबई पोलिसांमध्ये खरंच हिम्मत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा. ज्यांनी राज्यातल्या हजारो पीडितांची थट्टा केली.

मला सरकारलाही सांगायचं कि, अशा धमक्यांना, अशा नोटिसांना, अशा गुन्ह्यांना मी घाबरणार नाही. ज्या ज्या वेळी असे अत्याचार होतील त्या त्या वेळी तुम्हाला सोलून काढण्याचे काम आम्हीच करणार आहोत. 

गुन्हे दाखल केले तरी मी घाबरणार नाही, तुम्हाला नडत राहू, भिडत राहू अशी चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.