धुळे : खान्देशातील ग्रामदैवत असलेल्या कानबाई देवीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात धुळे जिल्ह्यात सुरुवात झाली.
खान्देशात कानबाईचा सण श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणा-या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. पंधरा दिवस आधी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते.
अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी देवीची स्थापना करतात. तांब्यावर नारळ ठेवलं जात त्या नारळाला नथ, डोळे लावून कानबाई मातेचं रूप दिलं जातं. त्याला अलंकारांनी सजवलं जातं. खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेले कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे परततात. यावेळी 'रोट'चा प्रसाद तयार केला जातो.