बापरे! शौचालयाच्या भांड्यासह गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये अडकली

कल्याणमधली धक्कादायक घटना, गर्भवती महिला जखमी

Updated: Aug 4, 2022, 03:03 PM IST
बापरे!  शौचालयाच्या भांड्यासह गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये अडकली title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात गेलेली गर्भवती महिला शौचालयाच्या भांड्यासह सेफ्टी टँकमध्ये पडल्याची घटना कल्याणजवळच्या मोहणे इथं घडली आहे.

कल्याण मोहने परिसरातील लहूजीनगरात 20 वर्ष जुने महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. गेली अनेकवर्ष याची दुरुस्ती न केल्याने शौचालय धोकादायक बनलं आहे. वारंवार तक्रार करुन देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

बुधवारी या शौचालयात एक गर्भवती महिला शौचास गेली असता शौचाच्या भांड्यासह सेफ्टीक टँकमध्ये पडून जखमी झाली. तिला नागरीकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. 

दरम्यान महापालिकेकडून हे शौचालय बंद करत त्या ठीकनी पर्यायी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.