बायकोची हौस पुरवण्यासाठी 'तो' करायचा बाईक चोरी... पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं ठोकल्या बेड्या

बायको माझी लाडाची चोरी करायचा गाडीची.... पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं असं पकडलं

Updated: Dec 23, 2021, 10:13 PM IST
बायकोची हौस पुरवण्यासाठी 'तो' करायचा बाईक चोरी... पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं ठोकल्या बेड्या  title=
प्रातिनिधिक फोटो

आतिश भोईर, कल्याण झी 24 तास : बायकोचे वाढते हट्ट पूर्ण करण्यासाठी पती कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. बायकोसाठी चक्क एका व्यक्तीनं गाड्या चोरल्या. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या बायको बरोबर मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून महागड्या दुचाक्या चोरी करायचा आणि त्या विकायचा.

या सराईत चोरट्याला मानपाडा पोलीसानी अटक केली आहे. दीपक सलगरे असं या आरोपीचं नाव आहे. हा आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करायचा. या दुचाक्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्याचे भासवून गरजुना स्वस्तात दुचाकीचे आमिष दाखवून विकायचा. काही दुचाक्या भंगारवाल्याला विकायचा. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं. दीपक सलगरेसह 5 जणांना अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली भागात दुचाकी गायब होत होत्या. त्यामुळे पोलीस दुचाकी चोरणाऱ्या भामट्यांच्या मागावर होतेच. यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथक देखील नेमली. भंगाराच्या दुकानावर देखील निगराणी ठेवले. संशयितांवर बारीक नजर ठेवली.

पोलिसांनी फिल्मी पद्धतीनं सापळा रचून  दीपक सलगरे या चोरट्याला पालेगावमध्ये अटक केली. त्याच्याविरोधात मानपाडा ,कोळसेवाडी, विठ्ठल वाडी,अंबरनाथ ,नारपोली ,उल्हासनगर आणि कल्याणमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

आरोपीकडून पोलिसांनी मानपाडा पोलिसांनी 17 दुचाक्या 23 दुचाक्यांचे  इंजिन इतर पार्ट्स ,एक कटर मशीन असा आठ लाख 24 हजार यांचा मुद्देमाल जप्त केला. याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय असल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.