मारहाणीत कोंबडीचा पाय मोडला, महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

घटनेची जिल्हाभरात रंगली चर्चा, पाहा नेमकी काय आहे घटना

Updated: Jul 5, 2022, 08:23 PM IST
मारहाणीत कोंबडीचा पाय मोडला, महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मारहाणीत कोंबडीचा पाय मोडला म्हणून एका महिलेविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून गुन्हाही नोंदवला गेला आहे.

नेमकी घटना काय?
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सिद्धार्थ नगर भागात राहणाऱ्या सुनीता जातुले या महिलेने काही कोंबड्या पाळल्या आहेत. या कोंबड्या परिसरात असलेल्या गटारात लोळून शेजारी राहणाऱ्या सरला पार्धे यांच्या अंगणात जाऊन घाण करत असत. यावरुन सुनीता आणि सरला यांच्या मध्ये काही दिवस पासून वाद सुरु होता. 

दोन दिवसांपूर्वी पुन्हा सुनीता जतुळे यांच्या कोंबडीने सरला पारधे यांच्या अंगणात जाऊन घाण केली. या गोष्टीचा राग आल्याने सरला पार्धे यांनी काठीने कोंबडीला मारले. यात कोंबडीचा एक पाय मोडल्याने सुनीता कोंबडीला घेऊन थेट पोलीस स्थानकात दाखल झाली. सुनीताने सरला परधे या महिलेविरुद्ध कोंबडीला दुखपत करणं आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

सुनीत यांच्या तक्रारीवरुन सरला परधे या महिलेविरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पण घटनेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.