धक्कादायक! दोन मृत भावांना जिवंत करण्यासाठी त्यांनी...

...तर मृत व्यक्ती जिवंत होत असल्याचा दावा समाजमाध्यमांवर करण्यात आलाय

Updated: Aug 17, 2019, 08:15 PM IST
धक्कादायक! दोन मृत भावांना जिवंत करण्यासाठी त्यांनी...  title=

जळगाव : लोकांच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा अजूनही जाता जात नाही. जळगावात पाण्यात बुडून मरण पावलेले दोन सख्खी भावंडं पुन्हा जिवंत होतील या आशेने त्यांच्या पार्थिवावर अघोरी उपाय करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय तोही जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात...

बुडून मृत्यू झाल्यावर तीन ते चार तासांत मृतदेह हाती आल्यावरदेखील मृतदेहावर दीड क्विंटल जाड मीठ टाकून काही तास तसंच ठेवल तर मृत व्यक्ती जिवंत होत असल्याचा दावा समाजमाध्यमांवर करण्यात आलाय.

त्यानुसार जळगावच्या मेहरून तलावात मृत पावलेल्या महंमद उमेर जकी अहमद आणि महंमद अबूलैस जकी अहमद या दोघा भावंडाना रात्रभर मिठात ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय.