Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव

Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Dec 11, 2022, 01:32 PM IST
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव title=

Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Political News) मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा मोठा पराभव झाल्याने दूध संघावरील पकड आता कमी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपेचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचा विजय असल्याचे सांगितले जात आहे.

खडसे गटाला हा मोठा झटका  

 जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध संघाच्या (Dudh Sangh) निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना भाजप - बाळासाहेबांची शिवसेना यांनी  जोरदार धक्का दिला आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ बरखास्त करण्यापूर्वी मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे खडसे गटाला हा झटका मानला जात आहे. 

मंदाकिनी यांचा तब्बल 76  मतांनी पराभव 

भाजपचे (BJP) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी मंदाकिनी खडसे यांचा तब्बल 76  मतांनी पराभव केला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना 255 ते मिळाली आहेत, तर मंदाकिनी खडसे यांना 179 मते मिळाली आहेत. त्यामुळे खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा गृहतालुका असलेला मुक्ताईनगरमधून मंदाकिनी खडसे यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. 

 जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ खडसेंच्या महाविकास आघाडी सहकार पॅनलला केवळ 4 जागाच जिंकता आल्यायत. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील,  भाजप आमदार मंगेश चव्हाण,  शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे दिग्गज नेते विजयी  झालेत. तर तर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झाला आहे.

 सहकारी दूध संघाबाबत आरोप-प्रत्यारोप

जळगाव दूध संघावर एकनाथ खडसे यांचे संपूर्ण वर्चस्व होते. मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. निवडणुकीपूर्वी जिल्हा दूध संघावरुन मोठे राजकारण घडले होते. भाजपकडून दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला हेाता. तर खडसे यांनी दूध संघात प्रशासकाच्या काळात चोरी झाल्याचा आरोप करुन पोलीस ठाण्यासमोर एक रात्रभर उपोषण केले हेाते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र खडसेंना धक्का बसला आहे.