ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी पसरवली आग लागल्याची अफवा

 जालना-ते बदनापूर दरम्यान ही घटना घडली.

Updated: Jun 6, 2019, 03:15 PM IST
ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी पसरवली आग लागल्याची अफवा  title=

जालना : ट्रेनमधून प्रवास करताना हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भलत्याच डब्ब्यातून प्रवास करणे, विनाकरण डब्ब्याला लटकणे, अश्लिल हावभाव करणे असे प्रकार दररोज होत असतात. जालन्यामध्ये असाच एक हुल्लडबाजी प्रकार समोर आला आहे. या महाभागाला ट्रेनमधून खाली उतरायचे होते. यासाठी याने विचित्र प्रकार केला. चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची अफवा त्याने पसरवली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.आज दुपारच्या सुमारास जालना-ते बदनापूर दरम्यान ही घटना घडली. या हुल्लडबाजाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 

अमृतसर-नांदेड ही सचखंड एकसप्रेस नांदेडकडे जात असताना ट्रेनमधील हुल्लडबाज प्रवाशांना खाली उतरायचे होते. मात्र ट्रेन न थांबल्याने या तरुणांनी ट्रेनच्या डब्याना आग लागल्याची अफवा पसरवली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून खाली उड्या घेतल्या.तर काही महिलांनी लहान मुलांना ट्रेनमधून खाली फेकलं.

दरम्यान प्रवाशांनी ही ट्रेन थांबवल्यानंतर आग लागली नसून अफवा करण्यात आल्याच उघड झाले. मात्र तोपर्यंत अफवा करणारे हुल्लडबाज पळून गेले होते. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या असल्या तरी सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.अर्धा तास थांबल्यानंतर ही ट्रेन नांदेडकडे रवाना झाली.