घुसखोरी दिल्लीच्या संसद भवनात; चौकशी कल्याणमध्ये

 दिल्लीच्या संसद भवनाlतील घुसखोरी प्रकरणाचे कल्याण शहराशी जोडण्यात आले आहे. पोलिस कल्याणमध्ये कसून चौकशी करत आहेत. 

Updated: Dec 16, 2023, 07:17 PM IST
घुसखोरी दिल्लीच्या संसद भवनात; चौकशी कल्याणमध्ये title=

Parliament security breach :  संसदेमधील धुराच्या नळकांड्या प्रकरणानंतर कल्याणमधील दुकानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. संसदेच्या अधिवेशनात करून रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन काही तरुण घुसले होते.मात्र या तरुणांनी या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये कसून चौकशी केली जात आहे. 

या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू असताना  पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. तात्काळ शहरातील फटाके विक्रेत्यांच्या दुकानात चौकशी सुरू करण्यात आलेय. संसदेत ज्या रंगीत धुरांच्या नळकांड्या घेऊन काही तरुण घुसले होते, त्याच क्षमतेच्या धुराच्या नळकांड्या या कल्याण मधील विक्रेत्यांकडे आहेत का? याची पोलिसांनी दुकानात जाऊन चौकशी सुरू केली. मात्र, कल्याण मधील या फटाके विक्रेत्यांकडे अशाप्रकारे तितक्या क्षमतेच्या धुराच्या नळकांड्या नसल्याचं दुकानदारांनी पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी दुकानातील धुराच्या नळकांड्याचे काही नमुने आपल्या ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केलाय. पोलिसांच्या या सगळ्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, संसदेतल्या घुसखेरीमागे सर्वात मोठं कारण बेरोजगारी आणि महागाई असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 
संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

13 डिसेंबर रोजी  संसदेच्या अधिवेशनात सहा तरुण घुसले होते.  संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. मास्टरमाईंड ललित झा सोबत महेश नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलीय. संसदेत घुसखोरीचा कट

रचण्यात ललितसोबत महेशचा हात असल्याचं समोर आलंय. महेश हा आरोपी नीलम कौरच्या संपर्कात होता. मूळचा राजस्थानचा असलेला महेश मजुरी करायचा. गेल्या कित्येक दिवसांपासून तो भगतसिंह फॅनक्लब पेजच्या माध्यमातून नीलमशी संपर्कात होता. घटनेत सहभागी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

दीड वर्षांपासून रचत होते कट

घुसखोरी करणारे हे सर्वजण एकमेकांना ऑनलाईन ओळखत होते.. सर्वचजण भगतसिंग फॅन क्लबशी जोडले गेले होते. दीड वर्षांआधी सर्वजण म्हैसूरमध्ये एकमेकांना भेटले होते. तिथेच त्यांनी कट रचायला सुरुवात केली. तर काही महिन्यांआधीच चौघांची पुन्हा भेट झाली आणि या दुस-या भेटीत संसदेत घुसखोरी  करण्याच्या प्लॅनला अंतिम स्वरुप देण्यात आलं.. प्राथमिक चौकशीत चार आरोपींची नावं समोर आली आहे.. लखनौचा सागर शर्मा आणि म्हैसूरचा डी मनोरंजन खासदाराच्या पासवर व्हिजिटर गॅलरीत बसले होते. तर नीलम आणि अमोल शिंदे बाहेर थांबले होते. लातूरच्या अमोल शिंदेंने स्मोक कँडल्स आणल्या होत्या. दिल्लीला जाण्याआधी हे सर्व विकी शर्माच्या घरी गुरुग्राममध्ये थांबले होते.