प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्यातील (Indian Army) जवानाला देशाचं रक्षण करताना वीरमरण आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. लष्कराने मात्र याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. राहुल भगत (Rahul Bhagat) शहीद झाले नसल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता याबाबत संभ्रम वाढला आहे.(indian army jawan rahul anand bhagat martyred or self ended confusion about death grew)
जवान राहुल भगत अवघ्या 26 वर्षांचे होते. राहुल भगत रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील इसाने कांबळे (Mahad Isane Kamble) गावाचे रहिवासी होते. राहुल भगत यांच्या पश्चात आई वडील, भाऊ , पत्नी आणि 1 मुलगा असा परिवार आहे. राहुल भगत यांचे कुटुंब (पत्नी आणि मुलगा) ठाण्यात राहते तर आई वडील व भाऊ हे इसाने कांबळे गावात राहतात.
राहुल भगत जम्मूतील बारामुल्ला (Jammu Baramulla) इथे सीमेचे रक्षण करताना त्यांचं निधन आलं. आपल्या गावातील जवानातचं निधन झाल्याने आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
राहुल भगत यांचा जन्म 10 मार्च 1996 रोजी झाला होता. राहुल भगत वयाच्या 19 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते. भगत कुटुंबिय हे मुळचे मु.पो.पिंपळदरी, ता.औढा नागनाथ, जि.हिंगोली इथले आहेत. मात्र भगत कुटुंबिय महाड या गावी सन 1980 पासून राहतात.