अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये, मोदींवर असा साधला निशाणा

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका. 

Updated: Oct 5, 2018, 10:06 PM IST
अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये, मोदींवर असा साधला निशाणा title=

पुणे : इंदापूर येथील सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका. संसार न करणाऱ्यांना महागाई काय असते ते कसे कळणार, असा सवाल करत मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव आणि आम्ही पांडु हवालदार आणि सोंगाड्या असल्याचे सांगितले.

मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव आहेत. ते तुम्हाला न्याय देवू शकत नाही. संसारी माणूसच तुम्हाला न्याय देवू शकेल गळ्यच्यान खोटं बोलत नाही. जो संसारच करू शकत नाही  त्याला  महागाईची  परिस्थिती काय समजणार? एकटा जीव सदाशिव असा दादा कोंडकेचा पिक्चर होता, तशी  स्थिती मोदींची आहे. आम्ही झालोय पांडु हवालदार, सोंगाड्यासारखी आमची गत झालेय, असे म्हणताच सभेमध्ये हश्या पिकला.

आईजीच्या जीवावर बाईजी उदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार यांनी टोला हाणला. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील विळ्या भोपळयाचे वैर आख्य्या महाराष्ट्राला न्यात आहे. अजित पवारांचे जवळचे आणि सध्याचे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात इंदापूर तालुक्यातील कालव्यातून पाणी आणण्यावरुन नेहमीच एकमेकांविरूध्द आरोप प्रत्यारोप होतात. हाच पाण्याचा मुद्दा घेत आघाडी सरकारच्या काळात मी जलसंपदा मंत्री होतो. पण हे (हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता ) पाणी आणल्याचा दावा, करतात हा त्यांचा दावा साफचुकीचा आहे.