हेमंत चापुडे, झी मीडिया, शिक्रापुर, पुणे: हल्ली ऑनलाईन फसवणूकीला (online fraud) अनेक ग्राहक बळी पडताना दिसत आहेत. परंतु ग्राहकांसोबतच कंपन्यांचीही फसवणूक (consumer) होताना दिसते आहे, सध्या असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. एका बड्या कंपनीच्या मालाच्या विक्रीतून येणाऱ्या लाखो रूपयांवर कंपनीत काम करत असणाऱ्या डिलिवरी बॉयनेच (delivery boy) डल्ला मारला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या प्रकारानं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे ॲमेझॉन (amazon) कंपनीच्या मालातून विक्रीतून येणाऱ्या तब्बल 3 लाख 63 हजार रुपयांवर डिलिवरी बॉयनेच डल्ला मारल्याची घटना घडली. याप्रकरणी विलास सुरडकर यांच्यावरती शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास आता शिक्रापूर पोलीस करत आहेत. (In Shikrapur the delivery boy cheated on 3 lakh 63 thousand rupees from the sale of amazon companys goods)
सध्या अशा प्रकारांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे एकदंरीत ग्राहकच नाहीत तर कंपन्यांसाठीही ही चिंतेची बाब झाली आहे. यापुर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून याबद्दल कंपनींना कडक कारवाई करणं अपरिहार्य झालं आहे. लॉकडाऊनमध्येही (india lockdown) असे अनेक प्रकार घडताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे डिलिवरी बॉय यांच्यावरील विश्वासार्हता ठेवण्यावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये एका ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं ग्राहकाचा फोन दुसऱ्याला विकला होता आणि नंतर डिलिव्हरी झाल्याप्रमाणे स्टेटस अपडेट केले होते. या डिलिवरी बॉयला फसवणुकीच्या आरोपाखाली फसवणूकीच्या आरोपाखाली अटकही झाली होती. याबद्दल तक्रारदारनं तक्रारही दाखल केली होती.
पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील शिक्रापुर येथील ॲमेझॉन कंपनीच्या ऑफिसमध्ये कामाला असलेला कामगार ॲमेझॉनच्या वस्तूंचे 3लाख 63 हजार रुपये घेऊन फरार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विलास रमेश सुरडकर या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूरच्या मलठण फाटा येथे ॲमेझॉन कंपनीच्या वस्तूंचे पार्सल नागरिकांना पुरवणारे ऑफिस असून सदर ठिकाणी विलास सुरडकर या कामाला आहे. ॲमेझॉन कंपनीच्या वस्तू नागरिकांना दिल्यानंतर गोळा होणारे पैसे विलास दररोज बँकेत भरत असे 30 नोव्हेंबर रोजी वस्तूंचे एक लाख छत्तीस हजार रुपये आलेले असताना विलास याने सर्व पैसे ऑफिसमध्ये न ठेवता स्वतः जवळ ठेवून घेतल्याचा प्रकार ऑफिसच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दुसऱ्या दिवशी विलास कामावर न आल्याने तसेच त्याचा फोन देखील बंद लागत असल्याने व्यवस्थापक सुमित पवार यांनी विलास राहत असलेल्या रूमवर जाऊन चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पवार यांनी ऑफिसमध्ये येत सर्व वस्तूंची व रक्कमेची व्यवस्थित चौकशी केली असता ऑफिसमधील तब्बल 3 लाख 63 हजार रुपये विलास याने त्याच्याजवळ घेतले आणि त्यांनतर ॲमेझॉन कंपनीचा विश्वासघात करत रक्कम घेऊन फरार झाल्याने निदर्शनास आल्याने याबाबत सुमित शंकरराव पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विलास सुरडकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.
ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या घटनाही काही नवीन नाहीत. उत्तरप्रदेशमध्येही (uttar pradesh) अशीच एक घटना घडली होती. एका गुंडानं ऑनलाईन शॉपिंग कंपनी ॲमेझॉनची 40 लाखांची फसवूक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन डिलिव्हरी बॉईजनाही नामनिर्देशित केले होते. गुन्हेगारानं ग्राहक बनून ऑनलाईन मोबाईलची खरेदी केली होती आणि आपल्याला फोनच मिळाला नाही अशी तक्रार कंपनीकडे केली. खरंतर असा प्रकार झाल्यावर कंपनी पैसे (money) परत करते तेव्हा याचाच फायदा उचलून हा गुन्हेगार सारखं सारखं कंपनीकडे प्रोडक्ट न मिळाल्यामुळे पैसे परत करण्याची मागणी करू लागला तेव्हा कंपनीला या बाबत संशय आल्यानंतर मात्र व्यवस्थापनाकडून यावर कारवाई झाली आणि अनेक धक्कादायक खुलासे झाले.
डिलिव्हरी बॉयच्या अनेक तक्रारी आत्तापर्यंत आल्या असून या तक्रारींमुळे ग्राहक अधिक सावध झाले आहेत. कधीकधी ग्राहकांच्या गैरवर्तवणूकीचाही (fraud delivery boy) त्रास कंपनीला अथवा डिलिव्हरी बॉय यांना सहन करावा लागतो तर ग्राहकांसोबत डिलिव्हरी बॉयजचाही त्रास सहन करावा लागतो. अशावेळी सगळ्यांनीच सावध राहणं आवश्यक झालं आहे.