Crime News : माझ्या मित्रांसोबत SEX कर... मैत्रीणीची मैत्रीणीवर जबरदस्ती

Crime News :  माझ्या मित्रांना तु आवडली आहेस. तु यांच्यासोबत सेक्स कर असे तिने मैत्रिणीला सांगितले. तसेच यासाठी तुला पाच हजार रुपये देते असे देखील या महिलेने सांगितले. मैत्रीणीचे हे विचित्र बोलणं ऐकून पीडित महिलेला धक्का बसला.

Updated: Mar 14, 2023, 06:18 PM IST
Crime News : माझ्या मित्रांसोबत SEX कर... मैत्रीणीची मैत्रीणीवर जबरदस्ती  title=

Pune Crime News : मैत्रीचा नावाला काळिमा फासणारे कृत्य एका महिलेने केले. एका मैत्रीणीने आपल्या मैत्रीणीसोबत असा प्रकार केला आहे ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. या मैत्रीणीने तिच्या मैत्रीणीला घरी बोलावून मित्रांसोबत सेक्स करण्यास भाग पाडले. पुण्यात ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे (Pune Crime News). 

पीडित महिलेने आरोपी महिलेसह तिघांविरुद्ध पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या महिलेसह तिघा जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे .आरोपी महिला ही  पुण्यातील धनकवडी येथील बालाजीनगर परिसरात राहते. पीडित आणि आरोपी महिला या दोघी एकमेकींच्या मैत्रीणी आहेत. मागील अनेक वर्षांपासून दोघी एकमेकींना ओळखतात. याच ओळखीचा फायदा घेत आरोपी महिलेने मैत्रिणीला धोका दिला. 

आरोपी महिलेने रात्री साडे दहाच्या सुमारास पीडित महिलेला घरी भेटायला बोलवले. यावेळी आरोपी महिलेचे दोन मित्र देखील तिच्या घरी उपस्थित होते. माझ्या मित्रांना तु आवडली आहेस. तु यांच्यासोबत सेक्स कर असे तिने मैत्रिणीला सांगितले. तसेच यासाठी तुला पाच हजार रुपये देते असे देखील या महिलेने सांगितले. मैत्रीणीचे हे विचित्र बोलणं ऐकून पीडित महिलेला धक्का बसला.

पीडित महिलेने सेक्स करण्यास नकार दिला. यावेळी या महिलेने तिला धमकावले आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवेन अशी धमकी दिली. यावेळी पीडित महिलेने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने आणि तिच्या मित्रांनी पीडीतेला अडवले. 

या तिघांनी मिळून पीडितेला शीवीगाळ केलीय यावेळी आरोपी महिलेच्या दोन मित्रांनी पीडितेचा विनयभंग केला. पीडित महिलेने स्वत:ची सुटका करुन घेतली. यानंतर तिने थेट पोलिस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.