कल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले

कल्याण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीलाच संपवले आहे. मुलीच्या मित्रांच्या मदतीने तिने अगदी पद्धतशीर पद्धतीने पतीची हत्या केली. महिलेचे हे कृत्या पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. 

Updated: Dec 10, 2023, 11:08 PM IST
कल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले    title=

Kalyan Crime News: कल्याण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीलाच संपवले आहे. मुलीच्या मित्रांच्या मदतीने तिने अगदी पद्धतशीर पद्धतीने पतीची हत्या केली. महिलेचे हे कृत्या पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. 

कल्याण पूर्वेतील विजयनगर अमराई परिसरात ही धक्कादायक घटना घडलेय. येथील एका घराला आग लागली असं सांगण्यात आलं पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. 

चौकशीत धक्कादायक खुलासा

या आगीच्या घटनेची चौकशी करताना अत्यंत  धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नीनचे पतीलाजिवंत जाळण्यासाठी घराला आग लावली.  हरिचंद्र पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  पत्नी आणि मुलीच्या मित्राने हरिचंद्रला पेटवुन घरात आग लागल्याचा बनाव केला. हरिचंद्र यांच्या पत्नीने आपल्या मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने आपल्या पतीला ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे घरात आग लागली. 

पती हरिश्चंद्र पवार याचा नवी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पतीच्या हत्येप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी पत्नी अश्विनी पवार हिला अटक केली आहे. या प्रकरणात अश्विनी पवार हिला साथ देणाऱ्या सिद्धेश आणि रितेश या दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहे. हरिश्चंद्र पवार यांना जाळण्यासाठी नक्की कोणत्या पदार्थाच्या वापर केला आहे याच्या देखील तपास पोलीस करीत आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

निर्दयी बापाने केली आपल्या 7 वर्षीय मुलाची आणि पत्नीची हत्या 

कल्याणमध्ये एका निर्दयी बापाने आपल्या 7 वर्षीय मुलाची आणि पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अश्विनी गायकवाड आणि अदिराज गायकवाड अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. उशीने तोंड दाबून ही हत्या केली. कल्याणमधील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी दीपक गायकवाडला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. पैशांसाठी दिपक पत्नीला कायम त्रास देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. याच वादातून शुक्रवारी दीपकने पत्नी आणि 7 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली.