पुणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख बाजारपेठा सुरू होणार आहेत. महापालिका आयुक्तांनी या विषयीची नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात आल्या आहेत.
-लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमटेकर रस्ता, सिंहगड रस्ता यांसह प्रमुख बाजारपेठा
- खाद्यपदार्थ पार्सल सेवा
- घर कामगारांची कामे
- पथारी व्यवसाय ( विशिष्ट रस्त्यांवर)
- शासकीय कार्यालये
- माहिती तंत्रज्ञान कार्यालये
- बँका, पतसंस्था
- कुरिअर सेवा
- अत्यावश्यक सेवेतील वाहने
- मॉल तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स
- सार्वजनिक वाहतूक म्हणजे पीएमपीएल बसेस
- रिक्षा, कॅब, बसेस
- सलून आणि ब्युटी पार्लर
- हॉटेल्स, रेस्टोरंट्स
- मल्टिप्लेक्स, नाट्यगृह
- खासगी ऑफिसेस
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी त्याबाबत अनेक प्रकारचे नियम घालून देण्यात आले आहेत.
-महापालिका हद्दीत सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी असेल
-६५ वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षाखालील मुलांना घराबाहेर पडता येणार नाही
- कुठल्या दिवशी कुठली दुकाने सुरु ठेवायची याची यादी देण्यात आली आहे. त्यानुसारच दुकाने उघडली जातील.
-दुकानांमध्ये सुरक्षित अंतर, स्वच्छता, मास्क, गलोवज या गोष्टी बंधनकारक आहेत
-सरकारी कार्यालयात ३३ टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील
-आयटी आस्थापना मध्ये ५० टक्के किंवा त्याहून कमी कर्मचारी संख्येत काम करावे लागणार आहे
- प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कामासाठी जाता येणार नाही
- परवानगी असलेल्या कामासाठीच वैयक्तिक वाहनांचा वापर करता येणार आहे
- चार चाकी मध्ये १ + २ तर दुचाकीवर फक्त एकाला परवानगी आहे
एकुणात विचार केल्यास प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील म्हणजे जवळ जवळ ९७ टक्के शहर आजपासून खुलं होणार आहे. असं असलं तरी त्यासंदर्भात महापालिकेनं घालून दिलेल्या निर्बंधांच पालन पुणेकरांना करावं लागणार आहे.