MPSC च्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय

  MPSC  (Maharashtra Public Service Commission) ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी काहीशी दिलासादायक आणि  महत्वाची बातमी आहे.

Updated: Jul 28, 2021, 04:35 PM IST
MPSC च्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  (Maharashtra Public Service Commission)  परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी काहीशी दिलासादायक आणि  महत्वाची बातमी आहे. MPSC च्या भरतीप्रक्रीयेचा मार्ग आता मोकळा झालाय. शासनाच्या सर्व विभागांमध्ये एकूण किती रिक्त पदं आहेत, त्या रिक्त पदांचा प्रस्ताव संबंधित विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात (Mantralay) बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Important decision for  Maharashtra Public Service Commission candidates  paving the way for MPSC recruitment process)

विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट देण्यात आली आहे. पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत आयोगाकडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.