Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप

शाळांपासन नोकरदार वर्गालाही या दिवसांमध्ये सुट्ट्या मिळतात. त्यामुळं यादरम्यान असंख्य बेत आखले जातात. पण, यंदा बेत आखण्यापूर्वी पाहा ही बातमी 

Updated: Oct 14, 2022, 12:48 PM IST
Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप  title=
IMD predicts medium to heavy rain fall in state on Diwali 2022

Maharashtra Rain : ऑक्टोबर (October) महिना उजाडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि त्यामागोमाग दसराही झाला. अवघ्या काही दिवसांवर आता दिवाळी (Diwali 2022) येऊन ठेपली. पण तरीही पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अद्यापही परतीचा पाऊस महाराष्ट्राच दाखल झाला नसून, त्याची वाट गुजरातमध्येच अडली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात ऐन ऑक्टोबरमध्ये कधी कडाक्याचं ऊन तर, कधी मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. पिकं कापणीला आलेली असतानाच होणारा पाऊस बळीराजापुढचं मोठं आव्हान ठरत आहे. 

संकटांची ही रांग इतक्यावरच संपत नाहीये. किंबहुना तुम्ही जर दिवाळीत हा पाऊस नसेल, मग आम्ही मस्त सुट्टीसाठी (Diwali Holidays) कुठेतरी बाहेर जाऊ अशी आशा बाळगत बेत आखत असाल तर आताच सावध व्हा. कारण, ऐन दिवाळीच्या दिवसांमध्येही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थोडक्यात यंदाची दिवाळी या पावसाच्या हजेरीमुळे ओलीचिंब असणार असंच म्हटलं जात आहे.

माहितीसाठी : Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा दणका, कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहून गेली कार । पाहा व्हिडिओ

20 ते 24 ऑक्टोबरदरम्यान मगाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. किंबहुना याआधी म्हणजेच 15 ते 17 ऑक्टोबरमध्ये कोकण, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

पावसाचा मुक्काम दरवर्षी नेमका का वाढतोय? 
गेल्या काही वर्षांमधील पर्जन्यमानाचा अंदाज घेतला, तर आता पावसाळा हा ऋतू आता चार महिन्यांपुरताच मर्यादित राहिलेला नसून, कमीजास्त प्रमाणात तो वर्षभर हजेरी लावताना दिसत आहे. असं होण्यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. यामधील सर्वात गंभीर कारण म्हणजे जागतिक तापमान वाढ. ज्यामुळं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातही बदल गो असून, यामुळं सातत्यानं कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. परिणामी ढगफुटी (Cloudburst) आणि वादळांच्या (Cyclone) घटनांमध्ये वाढ झाली आहे.