Rain Updates : गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsv 2022) काही अंशी उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. (Maharashtra Rain) महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या मुसळधार पाऊस बरसू लागला आहे. इतकंच नव्हे, तर तुम्ही त्याच्या परतीची वाट पाहत, असाल तर किमान सध्यातरी तशी काही अपेक्षा ठेवू नका. कारण, पुढचे 2 दिवस पुण्यासह (Pune Rain) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय सध्या बरसणारा पाऊस परतीचा नाही अशी अत्यंत महत्त्वाची माहितीही पुणे हवामान विभागाने दिली आहे. (IMD predicts heavy rain monsoon in Mumbai maharashtra Konkan region )
सध्यातरी पावसानं परतीची वाट धरली असं तुम्हाला वाटत असल्यास तो मोठा गैरसमज असेल. कारण, अद्यापही पाऊस काही आपली पाठ सोडत नाही हेच स्पष्ट होत आहे.
आजचा दिवस पावसाचा...
मंगळवारी पहाटेपासूनच (Mumbai rain) मुंबईत जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. काही तास झालेल्या सततच्या पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील (Bandra, Santacruz, Malad) वांद्रे, सांताक्रुझ, मालाड, कांदिवलीतही पावसानं जोर पकडल्याचं दिसत आहे.
साईनगरीला पावसानं झोडपलं
(shirdi) शिर्डी आणि परिसराला पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे, मागील तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर-मनमाड महामार्गाला ओढ्याचं स्वरूप आलंय. शिर्डीजवळच्या सावळीविहीर गावातील नागरिकांच्या घरातही पाणी घुसलंय.
कोकणाची काय अवस्था? (Konkan Rain)
(Sindhudurg) सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं. सलग दुसऱ्या दिवशी निर्मला नदीला पूर आला. त्यामुळे 27 गावांना जोडणारा आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा यामुळे संपर्क तुटला. आंबेरी पुलावर वाहतूक ठप्प झाली. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.