महाराष्ट्रात कॉफीशॉपच्या नावाखाली काय चाललंय पाहा...!

नांदेड शहराजवळ कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील प्रकार उघड झाला आहे. सरपंच आणि ग्रामस्थांनी धाड टाकून हा गैरप्रकार उघडकीस आणला आहे.

Updated: Sep 15, 2018, 05:49 PM IST
महाराष्ट्रात कॉफीशॉपच्या नावाखाली काय चाललंय पाहा...! title=

नांदेड : नांदेड शहराजवळ कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील प्रकार उघड झाला आहे. सरपंच आणि ग्रामस्थांनी धाड टाकून हा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कॉफी शॉप्सना पेव फुटलंय. (बातमीचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली)

या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल ३२ कॉफी शॉप उघडलेत. या कॉफी शॉपच्या नावाखाली भलतेच प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी धाडी टाकून गैरप्रकार आढळलेल्या १५ कॉफी शॉपचे व्यवसाय परवाने रद्द केले होते.  

परवाने रद्द केल्यानंतरही एक कॉफी शॉप सुरु असल्याची माहिती मिळाली. यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. अंधार असलेल्या खोल्यांमध्ये मोठे सोफे आणि बसण्याची व्यवस्था आढळलीय. 

स्वतंत्र कॅबिनमध्ये सोफ्यांची व्यवस्था होती. कॉफी बनवण्याचे सर्व साहित्य मात्र ६ महिन्यापासून वापरात नसल्याचे दिसून आलं. या ठिकाणी काही आक्षेपार्ह वस्तूही आढळल्यात. कॉफी शॉपमध्ये असलेल्या 3 जोडप्यांना ग्रामस्थांनी पोलीसांच्या स्वाधीन केलं.