Abdul Sattar: "...म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली"; अब्दुल सत्तार यांचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics: अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Updated: Dec 10, 2022, 09:24 PM IST
Abdul Sattar: "...म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली"; अब्दुल सत्तार यांचा मोठा खुलासा! title=
Abdul Sattar

Abdul Sattar Nashik: शिवसेनेच्या (Shiv sena) इतिहासातील सर्वात ऐतिहासिक बंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. शिंदे गटाच्या तब्बल 40 आमदारांनी राज्यातील सरकार पाडलं आणि राज्यात शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपचं (BJP) नवं सरकार स्थापन झालं. शिवसेनेत एकोपा नसल्याच्या चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात होत होत्या. अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा खुलासा केला आहे. (If he had stayed with Uddhav Thackeray the former MLA would have been named says Abdul Sattar)

काय म्हणाले Abdul Sattar?

उध्दव ठाकरे यांच्या (Udhhav Thackeray)  सोबत राहिलो असतो तर माझ्या नावापुढे माजी आमदार पाटी लागली असती, ते चालले नसते, मला पुन्हा निवडून यायचं आहे, असा सनसनाटी खुलासा अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलाय.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) असताना उद्धव ठाकरे यांची तब्येत बारी नव्हती. त्यावेळी रश्मी ठाकरेंना (Rashmi Thackeray) मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असं सांगितलं होतं, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मात्र, आम्हीच नंतर निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी विषयाला फुल्लस्टॉप दिला.

आणखी वाचा - Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."

दरम्यान, अब्दुल सत्तार आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी जिल्हा कृषी महोत्सवाचे (Krushi Festival) आयोजन करण्यात आलं होतं. कृषीमंत्र्यांना कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. टोमॅटोचा भाव पडतात असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय.