Crime News : नाव प्रभुनाथ पण कृत्य राक्षसी, ना भिती, ना पश्चात्ताप... पतीचा निर्दयीपणा पाहून पोलिसही हादरले

Crime News : रात्रभर बायकोच्या मृतदेहाजवळ बसून विचार केला आणि सकाळी उठून कामावर गेला. नवऱ्याचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. 

Updated: Mar 14, 2023, 03:48 PM IST
Crime News :  नाव प्रभुनाथ पण कृत्य राक्षसी, ना भिती, ना पश्चात्ताप... पतीचा निर्दयीपणा पाहून पोलिसही हादरले

प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा : संशयाचे भूत डोक्यात शिरले आणि होत्याचे नव्हते झाले. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा (Nalasopara) येथे घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी रात्रश्रर  रात्रभर बायकोच्या मृतदेहाजवळ बसून विचार करत होता. यानंतर तो सकाळी उठून कामावर गेला. आरोपीचे हे निदर्यी कृत्य पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला (Crime News).  

नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाणे हद्दीतील वालईपाडा येथे हा गुन्हा घडला आहे. पतीने पत्नीची टॉवेलच्या साहायाने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिता विश्वकर्मा असं मृत महिलेचे नाव आहे. प्रभुनाथ विश्वकर्मा असं आरोपी पतीचे नाव आहे.

आरोपी नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरुन त्यांच्यात नेहमी वाद होत असत. अशातच सोमवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी झोपेत असताना प्रभुनाथ याने टॉवेलच्या साहायाने गळा आवळून पत्नीचे हत्या केली. आरोपीने आधीच पत्नीची हत्या करण्याचा कट रचला होता. 

यामुळेच आरोपीने आपल्या दोन्ही लहान मुलांना शेजारील चाळीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी सोडले. पत्नीची हत्या केल्यानंतर तो  रात्रभर विचार करत करत मृतदेहाजवळच झोपला. सोमवारी सकाळी सात वाजता उठून आरोपी कामावर गेला. पण, त्याचे मन लागत नसल्याने तो घरी आला. यानंतर दुपारी तो पेल्हार पोलीस ठाण्यात गेला. घडलेली सर्व हकीकत त्याने पोलिसांना सांगितली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पेल्हार पोलिसांनी या हत्या प्रकरणात आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास केला जातं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x