ठाणे : जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात पडून असलेल्या चार रुग्णवाहिकांना अचानक आग लागली.
गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णवाहिका पडून होत्या. त्यामुळे जागेची अडचणही होत होती. दरम्यान रुग्णवाहिका कोणी जाणिवपूर्वक जाळल्या की आपोआप जळल्या, याचा पोलीस तपास करत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
आज रूग्णालयाशी संबंधीत 3 घटना घडल्या. राजेशचे नातेवाईक संतप्त झालेत. या नातेवाईकांनी राजेशच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केलाय. नायर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजेशच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केलीय. या प्रकरणी डॉक्टरसह वॉर्ड बॉयला अटक करण्यात आलं आहे. मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्याने राजेश मारु या तरुणाचा हकनाक बळी गेलाय. त्यामुळे राजेशचे नातेवाईक संतप्त झालेत. या नातेवाईकांनी राजेशच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केलाय. नायर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजेशच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केलीय.
बीडच्या परळीमध्ये घडलीये धक्कादायक घटना. बीड जिल्ह्यातल्या परळी येथे ही दुर्देवी घटना घडलीये. आरती जाधव असे मृत पावलेल्या चिमुरडीचे नाव आहे. बुस्टर डोस दिल्यानंतर चिमुकली दगावली. बुस्टर डोस दिल्यानंतर ही चिमुकली दगावली. डोस दिल्यानंतर साधारण तीन तासांमध्ये त्याची रिअॅक्शन दिसू लागते असे तज्ञांचे मत आहे. मात्र शनिवारी लस दिल्यानंतर दिवसभरात तिच्यावर कोणतीही रिअॅक्शन झाली नाही.