पुणे : युद्धाची थरारक प्रात्यक्षिकं, मार्शल आर्ट्सचे विविध प्रकार आणि घोड्यांच्या शर्यतीचा थरार, हे सगळं पुणेकरांना अनुभवता आलं लष्कराच्या दक्षिण कमानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अश्वारोहण स्पर्धेत.
पुण्यातील रेसकोर्स येथे दरवर्षी लष्कराच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी दक्षिण कमानच्या वतीनं देण्यात येणारा सुवर्ण चषक फारेस्ट फेरी या घोड्याने पटकावला. यावेळी तलवारबाजी, तसेच लष्कराची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली.