ओव्हरहेड वायरला हात लावता क्षणीच...,पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

पुणे गोरखपुर एक्स्प्रेस (Pune Gorakhpur Express) सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभी असतानाच...

Updated: Oct 1, 2022, 03:43 PM IST
ओव्हरहेड वायरला हात लावता क्षणीच...,पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार title=
Horrific Video Man touches livewire at railway station in Pune nm

पुणे: आता पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी..पुणे रेल्वे स्थानकात (Pune railway station) मृत्यूचा थरार पाहायला मिळालाय. रेल्वेच्या डब्यांवर चढून एका तरुणाने ओव्हरहेड वायर (Overhead wire) हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हा तरुण 70 ते 80 टक्के भाजला आहे. त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लॉट होते. हा मन विचलित करणारा व्हिडीओ (Video) झी24 तासाच्या हाती लागला आहे. (Horrific Video Man touches livewire at railway station in Pune nm)

त्या तरुणाने ओव्हरहेड वायरला हात लावताच एकच स्फोट झाला आणि त्या तरुणाच्या (Man) संपूर्ण शरीराभोवती आगीचे (fire) लोट पाहिला मिळाले. ही घटना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली आहे.  

पुणे गोरखपुर एक्स्प्रेस (Pune Gorakhpur Express) सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभी असतानाच ट्रेनचा प्रवासी असलेला 28 वर्षीय तरुणाने रेल्वेच्या डब्यांवर चढण्याचा प्रयत्न केला. त्याला 2 वेळा रेल्वे कर्मचाऱ्यांनी हटकले. परंतु तिसऱ्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हा तरुण गोरखपूर एक्स्प्रेसच्या डब्यांवर चढला आणि त्याने ओव्हरहेड वायरला हात लावला.