हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...

 'झी २४ तास'कडे आरोपी विकेशच्या घरच्यांनी प्रतिक्रिया

Updated: Feb 4, 2020, 04:42 PM IST
हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात... title=

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळणाच्या धक्कादायक प्रकारानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज स्थानिकांनी हिंगणघाट बंदचा नारा दिला आहे. विकेश नगराळे असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान विकेशच्या घरच्यांनी 'झी २४ तास'कडे प्रतिक्रिया दिली आहे.

विकेश सकाळीच सर्वांच्या उठण्याआधीच घरातून निघून गेला होता. नंतर  विकेशने अशी घटना घडविली हे पोलीस घरी आल्यावर कळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या वडीलांनी दिली आहे. या घटनेसंदर्भात त्यानं काहीच सांगितलं नाही. त्याच्यावर तोडगा काढता आला असता असेही ते म्हणाले. 

विकेशची पीडित तरुणी सोबत 10 व्या वर्गापासून ओळख होती. विकेशने असं करायला नको होते. त्याने आपल्या मुलीचा विचार करायला हवा होतात असे त्याच्या पत्नीने सांगितले. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते.

विकेशच्या आईने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडित तरुणी सोबत जे घडले ते चूक आहे. अखेरीस ती ही कोणाची तरी लेक आहे, असे त्या म्हणाल्या.