हिंगणघाट जळीतकांड : आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुढील तापसाकरिता आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.  

Updated: Feb 8, 2020, 10:37 AM IST
हिंगणघाट जळीतकांड : आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी title=

नागपूर : वर्धा जिल्ह्यामधल्या हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याची पोलीस कोठडी आज संपत आहे. पुढील तापसाकरिता आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे कोर्टात गर्दी राहण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व वकिलांनी घटनेचा निषेध म्हणून विकेश नगराळेवर बहिष्कार टाकल्यामुळे त्याचं आरोपपत्र अजून पर्यंत एकाही वकिलाने घेतलेलं नाही. पोलिसांनी त्याच्याकडून घटनेवेळी वापरलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि बूट तसंच पेट्रोलची बाटली आणि इतर साहित्याचा यात समावेश आहे. 

हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर आला आहे. प्रकृती स्थिर असली तरी नाजूक आहे. एकतर्फी प्रेमातून पीडित तरुणीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पीडितेचं हृदयाचे ठोके वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तिचा ब्लड प्रेशर कमी जास्त होत असून हे तिच्या तब्येतीसाठी चांगले नसल्याचेही डॉक्टर म्हणाले. डाव्या हाताच्या बोटांमध्ये सुधारणा पण उजव्या हाताच्या बोटांमध्ये सुधारणा नसल्याचे डॉक्टरांना सांगितले.  

संतापाची लाट  
हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरलीय.