थांबा!...महामार्गावरील वाहतूक दोन्हीकडून थांबली...आणि मग एन्ट्री झाली....

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधून घेतो आहे. 

Updated: Jul 24, 2022, 10:30 AM IST
थांबा!...महामार्गावरील वाहतूक दोन्हीकडून थांबली...आणि मग एन्ट्री झाली.... title=

चंद्रपूर : रस्ते वाहतूक अपघाताचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. रस्त्या ओलांडताना नेहमी काळजी घ्या, असं सांगितलं जातं. आपण रस्त्यांनी जाताना अंध लोक, लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण रस्त्यावरून जात असताना गाडी थांबवतो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधून घेतो आहे. 

रुबाब असावा तो असा...

वाघाचा दरारा हा जंगलात नाही तर भर रस्त्यावरही अनेक वेळा आपण पाहिला आहे. विदर्भातील अनेक जंगल परिसरात वाघ रस्त्यावर वावरत असलेले व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण वाघासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली असं दृष्य तुम्ही कधी पाहिलं आहे का? हो, अगदी बरोबर जंगलातील वाघाचा दरारा हा महामार्गावर दिसून आला. म्हणून म्हणतात रुबाब असावा तो असा.

नेमकी काय आहे घटना

नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा इथे रस्त्याच्या कडेला एक वाघ बसला होता. या महामार्गावरून भरधाव वेगाने वाहन आणि अवजड वाहतूक सुरु होती. मग अशात रस्ता ओलांडायचा कसा असा प्रश्न या वाघासमोर पडला. या घटनेची माहिती वनपथकास मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मग काय या वाघासाठी चक्क महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी थांबविण्यात आली. वनविभागाच्या पथकाने वाघोबाला जाण्यासाठी रस्ता मोकळा करु दिला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबल्याची पाहून वाघोबाने मोठ्या अट्टीत आणि रुबाबा रस्ता ओलांडला. अचानक महामार्गावरून जात असलेल्या वाहन चालकाना एक वेगळाच दृष्य अनुभवता आलं. रस्त्यावरील अनेक लोकांनी हा क्षण आपल्या कॅमेरात कैद केला. 

जंगलातील प्राण्यांचा सन्मान केला पाहिजे

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1,75,000 पेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्येही हजारो कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. एका यूजर म्हणतो, आपण नेहमी जंगल्यातील प्राण्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना जागा पण पाहिजे. वाघोबा राजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांचंही खूप कौतुक होतं आहे.