पुणे : राज्यात यंदा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झालाय. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचं दिसतंय.
राज्यात पहिल्यांदाच बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८९.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत यंदाही मुलीची संख्या जास्त आहे. विभागवार निकालांचा विचार केल्यास सलग पाचव्या वर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वोत्तम लागलाय. कोकणातले ९५.२० टक्के विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झालेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून इथे ८८.२१ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल बोर्डानं तयार केलेल्या WWW.MAHRESULT.NIC.IN या वेबसाईटवर बघता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपला परीक्षा क्रमांक युझर नेम म्हणून वापरायचा आहे तर आपल्या आईचं नाव पासवर्ड म्हणून टाकायचं आहे. येत्या ९ जूनापसून विद्यार्थ्यांना आपआपल्या शाळा कॉलेजांमध्ये निकाल मिळेल.